खूप वर्षांपूर्वी उंबराच्या झाडाजवळ लहान लहान मुलं खेळत होती.त्यावेळी एक लहान मुलगी रोजच्या प्रमाणे
खेळत असताना अचानक बेशुद्ध झाली. ते पाहून बाकीची मूल घाबरून आरडाओरड करू लागली.त्यावेळी लोक धावत मुलांकडे आले असता त्यांना वच्छला नावाची मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. बऱ्याच वेळेनंतर शुद्धीवर आल्यावर मुलीने
उंबराच्या झाडाजवळ लख्ख प्रकाश दिसल्याचे सांगितले. त्या दिवसापासून मुलीमध्ये खूप बदल दिसू लागला.ती सकाळी
लवकर उठून दिवसभर देवाची मनोभावे पूजा करू लागली.तिची पूजा पाहून लहान मूल,गावकरी पूजा करू लागले.तसेच कुणी आजारी असल्यास औदूंबराचे दर्शन घेतल्यास तो पूर्ण बरा होऊ लागला. या चमत्काराची माहिती घेऊन अनेक लोक शिंगव्याला दर्शनासाठी येऊ लागली.मनोरुग्ण,साखळदंडाने बांधलेले ,दुर्धर आजारी लोकांना दवाखान्यामध्ये फरक पडला नाही ते या ठिकाणी मुक्कामी राहुन काही दिवसात पूर्ण बरे झाले.दर्शनासाठी आलेल्या लोकांना या ठिकाणी दैवी शक्ती असल्याचा अनुभव आला.ब्रह्मकुमारी वच्छला आक्का यांची आजीवन ब्रह्मचारी राहून अखंड देवपूजा आजही चालू आहे.